Back to Blog
लोकसेवेचा वसा! मालेगाव शहरात भव्य 'मोफत RO पाणपोई' कार्यान्वित. - image 1
लोकसेवेचा वसा! मालेगाव शहरात भव्य 'मोफत RO पाणपोई' कार्यान्वित. - image 2
Official Mandate

लोकसेवेचा वसा! मालेगाव शहरात भव्य 'मोफत RO पाणपोई' कार्यान्वित.

आमदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगावच्या जनतेसाठी स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे व सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

आज मालेगाव येथे शिवसेना नेत्या विधान परिषद आमदार भावना ताई गवळी यांच्या मार्गदर्शनात लोकनियुक्त नगराध्यक्ष ओमप्रकाश मधुकर खुरसडे व नगरसेवक, नगरसेविका शिवसेना यांच्या वतीने RO पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या पाणपोईचे मोफत उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यांच्या आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित मालेगाव शहराचे नगराध्यक्ष ओमप्रकाश मधुकर खुरसडे, उपाध्यक्ष पती महादेवराव खवले, सभापती आझादभाई पठाण, आरोग्य व शिक्षण सभापती सौ. सविता ताई सारडा, महिला व बालकल्याण उपसभापती सौ. प्रियंका अभिराज घुगे नगरसेविका रज्जुताई गजानन काळे यांच्यासह पोलीस निरीक्षक इंगळे साहेब, नगर पंचायत अधीक्षक इमरान साहेब, तसेच मोठ्या संख्येने पोलीस बांधव आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच , गजानन काळे, अंकुश गुजरे, सनी घुगे, जाफरभाई, गजाननभाऊ सारसकर, सर्व शिवसेना नगरसेवक, जिल्हाध्यक्ष प्रदीप मोरे, शहराध्यक्ष विकास बळी, रामभाऊ काटेकर, संदीपभाऊ कोपुरवार, सोनूभाऊ जिंतूरकर, सागरभाऊ भूतडा, गणेश वर्मा, अमोलभाऊ लादे, संतोषभाऊ जोशी, उदय तोंडे, सुनीलभाऊ पुरोहित, संतोष शेटे, अभी घुगे, संजय सारडा, सतीश सांगळे, गजानन केंद्रे, पंकज महाकाळ, विशाल बनचरे, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या पाणपोईमुळे नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध होणार असून, हा उपक्रम जनतेसाठी अत्यंत उपयुक्त व लोकहिताचा ठरणार आहे.

More Posts

Related Mandates & Insights

View All
मालेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, उच्छाहात साजरा

Heritage

मालेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, उच्छाहात साजरा

मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे नगराध्यक्ष ओम खुरसडे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी आयोजन. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगराध्यक्षांचा पुढाकार.

09 May 2026
मालेगाव पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे आक्रमक; पालकमंत्र्यांकडे केली निधीची मागणी

Social Welfare

मालेगाव पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे आक्रमक; पालकमंत्र्यांकडे केली निधीची मागणी

मालेगाव शहरातील गंभीर पाणीटंचाईवर उपाय म्हणून नगराध्यक्ष श्री. ओमप्रकाश मधुकरराव खुरसडे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन 'जिल्हा आकस्मिक निधी' देण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

30 Apr 2026
मालेगावात पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना; नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे यांचा पुढाकार

Development

मालेगावात पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना; नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे यांचा पुढाकार

"मालेगाव शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांश भागांमध्ये नगरपंचायती मार्फत काही ठिकाण वरून पाईप लाईन काही भागात बोअरवेल उभारण्याचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी आमदार भावनाताई गवळी, मी, सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच मुख्याधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही केली. या सामूहिक प्रयत्नांमुळे नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी सुद्धा पाण्याचा वापर काटकसरीने करावा." — ओम खुरसडे, नगराध्यक्ष मालेगाव

29 Apr 2026